Tuesday, September 22, 2009

झक मारली ब्लॉग सुरु केला...

प्रिय मित्रांनो,
टायटल वाचून थोडसं आश्चर्य वाटलं असेल आणि पुन्हा काय काय लिहितात ना लोक असही
वाटलं असेल. पण लिहिणा-यांची फार गोची होती ही वस्तुस्थिती आहे. कारण पुर्वी मी दैनिक लोकमतमध्ये काम करायचो. तिथं लोक दररोज काही ना काही छापायला आणून द्यायचे. देणा-याला
वाटायचं आपलं हे उद्या छापून येणारच. तो बिचारा रात्रभर याच विचारात. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये दुस-याचच काही छापलेलं असायचं. ज्यानं लेख दिला त्याचा तो कधीचाच कच-यात गेलेला असायचा.
त्यानंतर कळलं समाजवादी लेख 25 रूपयांना मिळायचा तर संघवादी तर फुकटात त्यामुळे कुणी लिहायला आणून दिलं तर मला त्याची किव यायची. आता जमाना बदललाय. पोरंसोरं घरी बसून ब्लॉगिंग ब्लॉगिग खेळतायत. आता मीही त्याच्यापैकीच एक कारण मी हे ऑफीसातनं करतोय.